Shambhuraj Desai Phone Call : कलेक्टरांना आलेला फोन शंभूराजेंनी उचलला, एका झटक्यात काम मार्गी
Shambhuraj Desai Phone Call : कलेक्टरांना आलेला फोन शंभूराजेंनी उचलला, एका झटक्यात काम मार्गी
साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे त्यांच्या जलद कार्यपद्धतीमुळे प्रचलित आहेत.त्यांच्याकडे एखादा प्रश्न आला की तडीस लावण्याचा त्यांचा हातखंडा आहे. असाच एक प्रत्यय आज जिल्हाधिकारी कार्यालयातील दालनात पत्रकार परिषद सुरू असताना आला. पत्रकार परिषद सुरु असताना अचानक जिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलवरील लँडलाईन फोनची रिंग वाजली आणि तो वाजत असलेला फोन थेट पालकमंत्र्यांनी उचलला समोरील व्यक्ती बऱ्याच दिवसापासून सातबारा दुरुस्तीच्या कामासाठी सरकारी कार्यालयामध्ये हेलपाटे मारत होता. याची तक्रार त्यांनी जिल्हाधिकारी यांना करण्यासाठी फोन केला आणि जिल्हाधिकारी समजून संबंधित व्यक्तीने स्वतःचे तक्रार केली मात्र त्यांवर पालकमंत्र्यांनी त्यांचा प्रश्न समजून घेऊन प्रांतधिकाऱ्यांना फोन लावून तात्काळ हा प्रश्न मार्गी लावण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरून सूचना दिल्या. यामुळे फोन करणाऱ्या व्यक्तीने शंभूराज देसाई यांचे आभार मानले आहेत. चुकून उचललेल्या फोन मुळे एकाचं काम मात्र मार्गी लावण्याच्या सूचना मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिल्या आहेत सध्या याचा.