Kapil Sharma | कपिल शोमध्ये Salman Khan ला बोलवल्यामुळे गोळीबार, बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी

कमेडियन Kapil Sharma च्या कॅनडातील कॅफेवर महिन्याभरात दोनदा गोळीबार झाला आहे. Kapil Sharma च्या Netflix शोच्या उद्घाटनाला Salman Khan ला बोलावल्यामुळे हा गोळीबार झाल्याचं समोर येतंय. Lawrence टोळीचा गँगस्टर Harry Boxter याने Salman Khan सोबत जो कोणी काम करेल त्याला मारून टाकू अशी धमकी दिली आहे. त्याच्या धमकीची ऑडिओ क्लिप समोर आली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये तो बोलतोय की, "यापुढे कोणत्याही दिग्दर्शक, निर्माता किंवा कलाकाराला धमकी नाही तर थेट छातीत गोळी झाडू." तसेच, "Salman सोबत काम करणारी व्यक्ती स्वतःच्या मृत्यूला जबाबदार असेल," असंही Harry Boxter बोलतोय. या घटनेमुळे मुंबईतील सेलिब्रिटीजच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांनी या संपूर्ण घटनेची गंभीर दखल घेतली आहे. Lawrence Bishnoi गँगकडून Salman Khan विरोधातल्या हालचाली आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचं बोललं जातंय. ABP या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola