VP Candidate | INDIA आघाडीची रणनीती, NDA च्या नावानंतरच उमेदवार.

इंडिया आघाडीच्या नेत्यांनी उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीबाबत चर्चा सुरू केली आहे. राहुल गांधींनी तृणमूल काँग्रेस, डीएमके, समाजवादी पार्टी, ठाकरे गट शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी यासंदर्भात संवाद साधला. उपराष्ट्रपतीपदासाठी इंडिया आघाडी आपली पुढील रणनीती एनडीएच्या उमेदवाराच्या घोषणेनंतरच ठरवणार आहे. एनडीएने आपला उमेदवार निश्चित केल्यानंतरच इंडिया आघाडी आपला उमेदवार जाहीर करेल, अशी माहिती समोर आली आहे. यापूर्वी द्रौपदी मुर्मू यांच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही अशीच रणनीती अवलंबली गेली होती. एनडीएने उमेदवार ठरवण्याचे सर्वाधिकार जेपी नड्डा आणि नरेंद्र मोदी यांना दिले आहेत. एनडीए ज्या निकषांवर उमेदवार देईल, त्याच निकषांवर इंडिया आघाडी आपला उमेदवार ठरवणार आहे. त्यामुळे आता उपराष्ट्रपतीपदासाठी इंडिया आघाडी कोणती व्यक्ती निवडते आणि एनडीए कोणाला पुढे करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोमेश कोलगे यांनी या चर्चेबाबत अधिक माहिती दिली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola