समुद्रात 80,000 लिटर तेलाचा साठा असलेला तराफा खडकावर आदळला, पालघरमधील मच्छिमारांवर संकट
संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर
Updated at:
29 May 2021 07:44 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतौक्ते चक्रीवादळामुळे 18 मे रोजी अलिबाग येथील भरकटलेलं जहाज पालघर मधील वडराई समुद्रकिनार्यालगतच्या खडकावर आदळलं असून हे जहाज तब्बल अकरा दिवसानंतर ही याच ठिकाणी आहे . मात्र हे जहाज खडकावर आदळल्याने या जहाजातील अनेक भाग हे फुटले असून या जहाजातील डिझेल आणि ऑइल याची गळती सध्या समुद्रात सुरू असून या गळतीमुळे समुद्र किनाऱ्यालगत तेलाचे तवंग तयार होऊ लागले आहेत . याचा विपरीत परिणाम पालघर जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यालगत होणाऱ्या मासेमारीवर होऊ लागला आहे.