
Narhari Zirwal : मंत्रालयाच्या गेटवरील प्रसंगावर नरहरी झिरवाळ यांचं स्पष्टीकरण
Narhari Zirwal : मंत्रालयाच्या गेटवरील प्रसंगावर नरहरी झिरवाळ यांचं स्पष्टीकरण
काल 20 ते 22 लोकांमध्ये 4 जण माझा स्टाफ होता.. त्यांचा मिरा भाईंदरचा गाईंच्या चाऱ्याचा प्रश्न होता.. मी काही ठराविक लोकांना कमिशनर यांच्यासाठी भेट घेऊन देणार होतो.. कुठल्याच सुरक्षा रक्षकाला चुकीचं बोललो नाही.. झालं असेल थोड फार.. विपर्यास सुरु आहे मी कुठल्या सुरक्षकाला ऑन पालकमंत्री नाराजी एमआयडीसी नसलेला जिल्हा हिंगोली ते आमदार, कार्यकर्त्यांनी मला सांगितलं त्यावर बोलताना मी म्हणालो.. हिंगोली गरिब जिल्हा आहे.. मलाही पालकमंत्री देताना अनुषेश भुरुन काढण्यासाठी पालकमंत्रीपद दिलं का ----------------------- काल मंत्रालयात जाताना २० ते २२ लोकं माझ्या सोबत होती. त्यातील ४ लोक माझ्या स्टाफचे लोक होते. परवा गोसावी समाजाची लोकं मला भेटायला अली होती. त्यांचा गुरांचा विषय होता. त्यांच्या पोटापाण्याचा तो विषय आहे. यासाठी मी त्यांच्या शिष्टमंडळाला बोलवलं होतं. मी काल कुठलीही दादागिरी सुरक्षा रक्षकांवर केली नाही. माझा तो स्वभाव नाही. अतिशय नम्रतेने मी त्यांना विनंती केली. मात्र जाणीवपूर्वक विपर्यास केला गेला. कुठलाही सुरक्षा रक्षक सांगेल की मी कुणावर दादागिरी केली माझ परवा जे भाषण झालं त्याबाबत माझ अजित पवारांसोबत बोलणं झालं. त्याठिकाणी देखील माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला. हिंगोली हा गरीब जिल्हा आहे कारण तिथ एमआयडीसी नाही, तिथला अनुशेष अजून पूर्ण नाही तो मार्गी लावण्याचा माझा प्रयत्न आहे. म्हणून भाषणात मी बोललो मी गरीब आणि हा जिल्हा सुद्धा गरीब. आता या सर्वांची गरिबी दूर करण्यासाठी मी स्वत मंत्र्याकडे जाणार आणि त्यांना मदत करणार. त्यांच्याकडे विनंती करणार मी गरीब आहे जिल्हा गरीब आहे आम्हाला मदत करा खात्यांतर्गत आम्ही सतत बैठका घेत आहोत. सध्या अन्न औषध प्रशासन खात्यात मनुष्यबळ कमी आहे, वाहन कमी आहेत, हाफकिन सारखी संस्था पुन्हा पुनरुज्जीवित करणं हे मी काम सुरू केलं आहे. राज्यात भेसळ ओळखणसाठी केवळ ५ लॅब आहेत. त्यामुळे तिथ सॅंपल तपासणी साठी पाठवलं तर कमीन ६ महिने लागतात. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यासाठी आम्ही मोबाईल व्हॅन तयार करत आहोत.