Pune : सासरच्या जाचाला कंटाळून जावयाची आत्महत्या,पुण्यातील निखील धोत्रे ठरला नैराश्याचा बळी ABPMajha
मिकी घई, एबीपी माझा
Updated at:
23 Aug 2021 10:04 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून जावयाने आत्महत्या केलीय. निखील धोत्रे असं या व्यक्तीचं नाव आहे. गोखले नगर इथल्या सुगम चाळीत राहणाऱ्या निखीलनं पत्नीच्या ओढणीनं गळफास घेऊन जीवन संपवलंय. सासुरवाडीचा जाच आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करत असल्याचे निखीलनं सुसाईड नोटमध्ये म्हटलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही निखीलनं सुसाईड नोटमध्ये केलीय. या सुसाईड नोटमध्ये निखीलनं आईसाठी भावनिक संदेशही लिहिलाय.