Pushpak Express Accident : पुष्पक एक्सप्रेसमध्ये काय घडलं? प्रत्यक्ष दर्शी प्रवाशांनी सगळं सांगितलं

Continues below advertisement

Pushpak Express Accident : पुष्पक एक्सप्रेसमध्ये काय घडलं? प्रत्यक्ष दर्शी प्रवाशांनी सगळं सांगितलं

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी भीषण दुर्घटना घडली आहे. पुष्पक एक्स्प्रेसला (Pushpak Express Fire) आग लागण्याच्या भीतीने प्रवाशांनी रेल्वेतून उड्या मारल्या. जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी या उड्या मारल्या होत्या. मात्र त्याचवेळी भुसावळकडे जाणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने (Karnataka Express) अनेकांना उडवले. या भीषण अपघातात (Train Accident) आतापर्यंत 13 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 25 जखमी झाले आहेत. जखमींवर जळगाव (Jalgaon News) आणि पाचोरा (Pachora) येथील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता जखमींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती प्रशासनाने दिली असून आता 13 मृतांपैकी 7 मृतांची ओळख पटली आहे. यात नेपाळमधील (Nepal) चार जणांचा तर उत्तर प्रदेशातील तीन जणांचा समावेश आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram