Pandora Papers : पँडोरा पेपर्समुळे अतिश्रीमंतांची झोप उडणार? Special Report
Pandora Papers : काही वर्षापूर्वी पनामा पेपर्सने बनावट कंपन्यांद्वारे पैशाचा फेरफार करणाऱ्या जगभरातील अनेक मोठ्या लोकांची तसेच भारतीयांची नावं उघड केली होती. त्याचप्रमाणे आता जगभरातील शोधपत्रकारांच्या टीमने, पँडोरा पेपर्सने लाखो कागदपत्रांचा अभ्यास करुन अवैध्य मार्गाने श्रीमंत बनलेल्या अब्जाधीशांची नावं उघड केली आहेत. या यादीत जगभरातल्या सध्याच्या 35 सत्ताधाऱ्यांची आणि 300 हून अधिक सेलिब्रेटींचा समावेश आहे. विशेष म्हणजे यामध्ये भारतीय स्टार खेळाडू सचिन तेंडुलकरच्या नावाचा समावेश असल्याची चर्चा आहे. सचिनच्या नावासोबतच देशातील सहा मोठ्या राजकारण्यांची नावंही या यादीमध्ये असल्याचं सांगण्यात येतंय.
All Shows


































