Pakistan Kabuli Special Report : ऑपरेशन सिंदूरचा पाकला दणका, पाकचीच कबुली
Pakistan Kabuli Special Report : ऑपरेशन सिंदूरचा पाकला दणका, पाकचीच कबुली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 मे रोजी रात्री 8 वाजता देशाला संबोधित केलं होतं. त्यामध्ये त्यांनी ऑपरेशन सिंदूर स्थगित केलं असून पूर्णपणे थांबवलेलं नसल्याचं म्हटलं होतं. मोदी म्हणाले होते की पाकिस्तानमध्ये दहशतवादी आणि लष्करी ठिकाणांवरील कारवाईला स्थगित केलं आहे. पाकिस्तान यापुढं कसं वागतंय त्याप्रमाणं त्याला उत्तर दिलं जाईल. पाकिस्ताननं भविष्यात काही चूक केली तर भारताची तिन्ही सैन्यदलं उत्तर देण्यास तयार आहे. मोदींच्या या वकत्व्यावर पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाची प्रतिक्रिया समोर आली आहे.
पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयानं म्हटलं की भारताच्या आक्रमक कारवाईमुळं पाकिस्तान संकटाच्या दारात उभा आहे. पाकिस्ताननं नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यांवर देखील आक्षेप घेतले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरुन या क्षेत्रात शांततेसाठी प्रयत्न सुरु असताना मोदींकडून आक्रमक भाषणं सुरु असल्याचा कांगावा पाकिस्ताननं केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमधील आदमपूर एअरबेसवरुन पाकिस्तानला इशारा दिला. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी एक वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, त्यांनी दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले आहेत. ख्वाजा आसिफ यांचं वक्तव्य पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर खराब होत असलेली प्रतिमा वाचवण्याचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे.
All Shows





महत्त्वाच्या बातम्या




























