OBC Reservation Special Report : ओबीसी एकीत 'टोकाची' बेकी; भुजबळांची भूमिका अनेकांना नावडती
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppOBC Reservation Special Report : ओबीसी एकीत 'टोकाची' बेकी; भुजबळांची भूमिका अनेकांना नावडती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सध्या मराठा आरक्षणाचा विषय ऐरणीवर आलाय... मनोज जरांगे यांनी ओबीसीतून मराठा आरक्षणाची मागणी केलीय... तर, त्यांच्या या मागणीला ओबीसी समाजाने विरोध केलाय... जरांगेंच्या सभांना मिळणारा तुफान प्रतिसाद पाहता, त्याला उत्तर देण्यासाठी ओबीसी नेत्यांनीही महाएल्गार मेळावा घेतला... आणि तोही तिथंच... जिथून मनोज जरांगेंनी आंदोलनाची मशाल पेटवली आणि त्याची दिंडी महाराष्ट्रभर फिरवली, त्या जालन्यातच... या महाएल्गार मेळाव्यात नेत्यांची एकी तर दिसलीच... मात्र छगन भुजबळांचा जुना आक्रमक अवतारही पाहायला मिळाला... मात्र काही दिवस व्हायच्या आतच ओबीसी नेत्यांमध्ये फूट पडलीय की काय? आणि त्याला कारण भुजबळच कसे ठरलेत?