ST Fare hike : ST ची आजपासून भाडेवाढ, परिवहन मंत्री Pratap Sarnaik यांचा मोठा निर्णय

Continues below advertisement

ST Fare hike : ST ची आजपासून भाडेवाढ, परिवहन मंत्री Pratap Sarnaik यांचा मोठा निर्णय

महाराष्ट्रातील एसटीच्या प्रवास भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी आणि रिक्षा, टॅक्सी भाडेवाढीसंदर्भात माहिती दिली. प्राधिकरणाची बैठक मंत्रालयात पार पडल्याची माहिती मला मिळाली आहे.   त्यामध्ये लोकप्रतिनिधींचा समावेश नसतो. गृह खात्याचे प्रधान सचिव, परिवहन खात्याचे प्रधान सचिव, अर्थ खात्याचे सचिव या तिघांच्या समितीच्या अंतर्गत ती एक बैठक आयोजित केले जाते. कालच्या बैठकीत निर्णय झाला आहे की एसटीची भाडेवाढ 14.97  टक्क्यांनी झाली आहे. रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ 1 फेब्रुवारीपासून लागू करण्यात येणार आहे. रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ 3 रुपयांनी झाली आहे. दिवसेंदिवस डिझेल, सीएनजीचे दर वाढत आहेत, त्यामुळं प्रत्येक वर्षी भाडेवाढ अपेक्षित असते. गेल्या तीन ते चार वर्ष भाडेवाढ झालेली नसल्यानं एकत्रितपणे  14.97 टक्के भाडेवाढ आजपासून लागू होईल, असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं. 

सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार आहे हे मान्य आहे, ती वस्तूस्थिती आहे. एसटी महामंडळाची स्थिती काही चांगली नाही. परिवहन खात्याचा चार्ज घेऊन एक महिना होत आला आहे. एसटीच्या उत्पन्नापेक्षा खर्च अधिक आहे. एसटीला दिवसाला तीन कोटी रुपयांचं नुकसान होत असल्यानं भाडेवाढ अपरिहार्य आहे. प्रवाशांना चांगली सेवा द्यायची असेल तर या गोष्टीची भविष्यात गरज असणार आहे. डिझेलचे दर वाढत आहेत, मेंटनन्सचा खर्च अधिक येतो. एसटीकडे 14300 स्वत:च्या बसेस आहेत. त्यावर 87 हजार कर्मचारी काम करत आहेत.  गेल्या तीन चार वर्षांपासून भाडेवाढ करण्यात आलेली नव्हती. त्यावेळी भाडेवाढ करण्यात आलेली आहे. एकत्रितपणे भाडेवाढ करण्यापूर्वी दरवर्षी भाडेवाढ केली तर प्रवाशांना भुर्दंड पडणार नाही, असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram