Special Report | नवनीत राणा यांना खरंच अरविंद सावंत यांनी धमकी दिली?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Mar 2021 09:46 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : लोकसभेत शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी आपल्याला धमकावल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. काल लोकसभेत सचिन वाझे आणि 100 कोटींच्या वसुलीच्या मुद्द्यावर बोलताना ठाकरे सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर खूप गंभीर आरोप केले. त्यानंतर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी आपल्याला कारागृहात टाकण्याची धमकी दिली, असा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आपल्याला संसदेच्या लॉबीमध्ये धमकावलं. महाराष्ट्रात तू कशी फिरते ते बघतोच. तुलाही तुरुंगात डांबू, अशी धमकी अरविंद सावंत यांनी दिल्याचं नवनीत राणा यांनी पत्रात म्हटंलं आहे.