Nashik Godavari River : खळाळून वाहणाऱ्या गोदावरीचे रौद्र रुप ड्रोनच्या नजरेतून Special Report
abp majha web team
Updated at:
15 Jul 2022 10:04 AM (IST)
नाशिक जिल्ह्यात मागील आठवड्यापासून पावसाचा मुक्काम कायम आहे, धरण भरली आहेत, नद्या दुथडी भरून वाहाताय, धबधबे धो धो कोसळत आहेत, गोदामाईने अक्षरशः खळाळून वाहतोय, गोदामाईचे कुठे रौद्र तर कुठे आल्हाददायक रूप बघायला मिळतंय, रामकुंड परिसरातील मंदिरांना गोदावरीने वेढा दिलाय रस्ते पूल पाण्याखाली गेलेत, पावसाचे आणि गोदावरीची अनेकरूप बघायला मिळताय गोदामाईचे हेच रूप डोळ्यात साठवण्यासाठी नागरीक ही गर्दी करत आहे, गंगापूर धरणापासून नाशिकच्या दसक पंचक पर्यंत साधारणपणे 30 किलोमीटरचा गोदावरीचा नाशिक शहरातून प्रवास आहे आम्ही ही आमच्या प्रेक्षकांसाठी गंगापूर धरण, सोमेश्वर रामकुंड परिसराचे गोदामाईचे दर्शन घडवीत आहोत. ड्रोन ऑपरेटर राज चौधरी यांच्या सह प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी आढावा घेतलाय