ABP Majha Headlines : 8 PM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीसांमध्ये पाऊण तास खलबतं...बैठकीत नेमकं काय ठरलं याची राज्याला उत्सुकता...

राष्ट्रवादी अमित शाहांकडे 11 मंत्रिपद आणि राज्यपालपदाची मागणी करण्याची शक्यता...प्रफुल्ल पटेलांसाठी कॅबिनेट मंत्रिपदही मागणार असल्याची एबीपी माझाला सूत्रांची माहिती.

ठाण्यातील ज्युपीटर रुग्णालयात मेडिकल टेस्टनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कामाला सुरूवात, महापरीनिर्वाण दिनाच्या तयारीसाठी फडणवीसांसोबत ऑनलाईन बैठक

वर्षा बंगल्यावर शिवसेनेच्या आमदारांसोबत एकनाथ शिंदेंची खलबतं, शपथविधीपूर्वी शिवसेनेच्या मागण्या पूर्ण झाल्यात का याचा सस्पेन्स कायम

एकनाथ शिंदेंच्या आजारपणाचे चुकीचे अर्थ काढू नका, गुलाबराव पाटलांचं आवाहन, शिंदे स्थिरस्थावर झाल्यावर सवाल उपस्थित करणाऱ्यांना उत्तर देऊ, शंभूराज देसाईंचा इशारा

शपथविधी ५ डिसेंबरला हे बावनकुळेंच्या ट्विटवरून समजलं, माजी मंत्री उदय सामंत यांचं भुवया उंचावणारं वक्तव्य, काल केसरकरांनी आळवला होता नाराजीचा सूर

कालच्या दुराव्यानंतर महायुतीच्या नेत्यांकडून आझाद मैदानावर शपथविधी सोहळ्याचा एकत्र आढावा, हम साथ साथ है दाखवण्याचा प्रयत्न

शिवसेना आणि भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर.. शिवसेनेची ७ तर भाजपच्या १६ मंत्र्यांच्या नावांची यादी ..भाजपकडून नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram