Devendra Fadnavis Eknath Shinde Meet : मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस शिंदेंच्या भेटीला वर्षा बंगल्यावर
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीसांमध्ये पाऊण तास खलबतं...बैठकीत नेमकं काय ठरलं याची राज्याला उत्सुकता...
Maharashtra Politicis News : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde), उदय सामंत (Uday Samant) आणि भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली आहे. तिघांमध्ये वर्षा बंगल्यातील मुख्यमंत्र्यांच्या अॅटी चेंबरमध्ये अर्धा तास चर्चा झाली आहे. संभाव्य खाते वाटपावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कालही गिरीश महाजन हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ठाण्याच्या शुभदिप बंगल्यावर दाखल झाले
मंत्रीपदाची संधी कोणा कोणाला मिळणार याकडं सर्वांचं लक्ष
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) महायुतीला (Mahayuti) स्पष्ट बहुमत मिळाले आहे. आता महायुतीच्या सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. महायुती सरकारचा शपथविधी सोहळा (Mahayuti Oath Ceremony) पाच डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर पार पडणार आहे. या सोहळ्याची सध्या जोरदार तयारी केली जात आहे. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र, मंत्रीपदाची संधी कोणा कोणाला मिळणार याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. अनेक इच्छुकांनी मंत्रीपदासाठी फिल्डिंग लावल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी उदय सामंत आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्यासोबत आज संभाव्य खाते वाटपावर चर्चा झाल्याची माहिती आहे.