Nagpur Special Report : नागपूरकरांचं आरोग्य धोक्यात, कोलार नदीत प्रदूषित पाणी मिसळण्याची भीती
abp majha web team
Updated at:
25 Jul 2022 11:03 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोराडी औष्णिक वीज प्रकल्पातील राखेचा बंधारा फुटल्यानंतर पंचक्रोशीत राख मिश्रित पाणी पसरल्याचे आणि त्यामुळे परिसरात झालेल्या पर्यावरणीय हानी आणि प्रदूषणाचे प्रकरण ताजे असताना.... आता खापरखेडा औष्णिक वीज प्रकल्पातील राखेच्या पाईपलाईन मधून लिकेज सुरू झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा औष्णिक वीज केंद्रातून एका पाईपलाईनच्या माध्यमातून औष्णिक वीज केंद्रातील राख मिश्रित पाणी वीज केंद्राच्या वारेगाव येथील राखेच्या बंधाऱ्यात पोहोचवले जाते. मात्र आता त्याच पाईपलाईन मधून लिकेज होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राख मिश्रित पाणी परिसरातील नाल्यांमध्ये आणि अखेरीस कोलार नदीमध्ये मिसळला जात असल्याचे समोर आले आहे