Nagarsevak With Eknath Shinde Special Report: शिंदेंना आता नगरसेवकांचाही पाठिंबा? ABP Majha
abp majha web team
Updated at:
13 Jul 2022 09:14 PM (IST)
विधान परिषद निवडणुकीचे नेिकाल आले आणि त्यानंतर एकनाथ शिंदेंनी बंडाचं निशाण फडकावत राज्यात वेगळाच राजकीय भुकंप आणला. शिंदेंच्या नेतृत्वात सेनेचे जवळपास २० आमदार सुरतला गेले. आणि त्यानंतर शिंदेंच्या गटात सामील झालेल्या सेना आमदारांचा आकडा वाढतच गेला. शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर सेनेतल्या अनेक पदाधिकारी, नगरसेवकांनी शिंदेंना पाठिंबा दिला. १२ खासदार सुद्धा शिंदेंच्या संपर्कात असल्याचं सांगितलं जातंय.