Nashik Farmer | केवळ सहा महिन्यांत शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यात महायुतीला यश, शेतकरी म्हणाले
Nashik Farmer | केवळ सहा महिन्यांत शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यात महायुतीला यश, शेतकरी म्हणाले
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. या मतदारसंघातून महायुतीतून (Mahayuti) भाजपने (BJP) विद्यमान आमदार सीमा हिरे (Seema Hiray) यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. तर महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena UBT) जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. तर राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) दिनकर पाटील (Dinkar Patil) यांना उमेदवारी दिली.
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या सीमा हिरे यांचा तिसऱ्यांदा विजय झाला आहे. 68116 मतांनी ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांचा सीमा हिरे यांनी पराभव करत विजय मिळवला. सीमा हिरे यांच्या उमेदवारीमुळे पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपचा अंतर्गत वाद उफाळून आला होता. मात्र सीमा हिरे यांनी निवडणुकीत बाजी मारली.