J P Nadda Special Report : लोकसभा निवडणुकीपर्यंत नड्डाच भाजपचे अध्यक्ष?
abp majha web team | 05 Jan 2023 11:13 PM (IST)

हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर नड्डांचं काय होणार याची कुजबूज राजकीय वर्तुळात सुरु झाली होती. हिमाचल हे नड्डांचं गृहराज्य...तिथेच पराभूत झाल्यानं नड्डांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या प्रतिमेवर काही परिणाम होतो का याचीही चर्चा होती. पण दिल्लीत लवकरच होणाऱ्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत नड्डांना मुदतवाढीची शक्यता आहे. पाहूया एक रिपोर्ट..