Dilip Walse Patil On Sharad Pawar : शरद पवारांचा मानसपुत्र असं मी नाही तर लोक म्हणातात-वळसे

Continues below advertisement

Dilip Walse Patil On Sharad Pawar : शरद पवारांचा मानसपुत्र असं मी नाही तर लोक म्हणातात-वळसे
मी स्वत:  कधीही म्हटलं नाही की मी शरद पवारांचा मानसपुत्र आहे , लोक म्हणायचे. * सार्वजनिक समारंभामध्ये कुटुंबं एकत्र आली म्हणजे कौटुंबीक संबंध होते असं होतं नाही. * शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा वहिनी भिमाशंकरला दर्शनाला आल्या की आमच्या घरी यायच्या .  * मी ग्रॅज्यूएट झाल्यावर पंचवीस वर्षांचा असताना शरद पवारांचा पी ए म्हणून काम सुरु केले. त्यानंतर आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. चाळीस वर्षे घरामधे जाणं येणं होत. * जर शरद पवार म्हणत असतील तर कौटुंबीक संबंध नसतील. * शरद पवार आणि माझे वडील एकाच वेळी १९६७ ला आमदार झाले. शरद पवार म्हणाले की त्यावेळी माझे वडील त्यांच्या मागे पहाडासारखे उभे राहिले होते.  * शरद पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर मिसेस पवार , मिसेस शिंदे, मिसेस अधिक आमच्या घरी आल्या . तेव्हापासुन येणं सुरु होत. * माझ्या मुलीचे सुप्रिया सुळेंसोबत कौटुंबीक संबंध नव्हते. राजकीय संबंध होते. यशवंतराव चव्हाण सेंटरला त्या एकत्र काम करत होत्या .( उपहासाने म्हणालेत ) * शरद पवारांनी कौटुंबीक संबंध नव्हते असं म्हटल्याने वेदना झाल्या . * जर एखादी व्यक्ती चाळीस वर्षे ये जा करत असेल तर त्याला कसले संबंध म्हणायचं हे लोकांनी ठरवायचं आहे. * अजित पवारांची सभा आमच्याकडे नको हे आम्हीच त्यांना सांगितले. सभेसाठी मोठी तयारी करावी लागते आणि त्यात वेळ जातो... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram