कायद्याचे म्युझियम आणि कचऱ्यातून सौंदर्य! दापोली पोलीस स्टेशनचा अनोखा उपक्रम | स्पेशल रिपोर्ट
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोकणाला अथांग असा समुद्र किनारा लाभला आहे..आणि त्या सौदर्यात अधिक भर घातलेल्या उंच उंच नारळी;पोफळीच्या बागा..कौलारू घरे.हे कोकणच निसर्ग सौदर्य इथे येणाऱ्या पर्यटकांना नेहमीच भुरळ घालते.त्यातीलच एक रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली. या दापोलीत हर्णे, आंजर्ले, केळशी समुद्रकिनारे लाभल्यामुळे दापोली पर्यटनस्थळ म्हणून प्रख्यात आले. या पर्यटनस्थळांचा आनंद लुटण्यासाठी इथे नेहमीच पर्यटकांची रेलचेल सुरु असते. आता इथे येणाऱ्या पर्यटकांना नवीन संग्रालय पाहायला मिळतय ते दापोलीचे पोलिस स्टेशन. दापोलीत प्रवेशद्वारातून आत येताना बस स्थानकाच्या समोरच नजरेस पडते पोलीस स्टेशन. या पोलिस स्टेशनच्या परिसरात आत प्रवेश करताच समोरच आपल्याला पाहायला मिळतात भिंतीवरील विविध सुचनांचे फलक. शोभीवंत झाडं, पोलिस कायद्या अंतर्गत होणारे गुन्हे रोखण्यासाठी आणि समानता दर्शवणारे प्रतीकात्मक फलक आणि प्रतिकृती या ठिकाणी उभारण्यात आले आहेत.