Mumbai Rope Way : महावीर नगरहून गोराईचा दीड तासांचा प्रवास होणार फक्त 36 मिनिटात
abp majha web team
Updated at:
06 Dec 2021 12:12 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : मुंबईत(mumbai ) रस्ते आणि जलमार्गावर होणारी रहदारी कमी करण्यासाठी आता हवेतून मार्ग बनविण्याच्या कामाने वेग घेतला आहे. मुंबईत 7.2 किलोमीटर लांबीचा रोपवे(Ropeway) बनविण्याची योजना सरकारने तयार केली आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) ने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी 2023 पासून पहिल्या रोपवेचे बांधकाम सुरू करण्याची योजना तयार करण्यात आली आहे. हे बांधकाम 2025 पर्यंत सुरू करण्याचे लक्ष्य आहे. पुढील वर्षाच्या अखेरीपर्यंत या प्रकल्पाचे काम सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवून, एमएमआरडीएने सवलतीधारकांच्या भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे.