Saif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यात
Saif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यात
अभिनेता सैफ अली खान प्रकरणात पोलिसांकडून कसून तपास सुरु आहे. तीन दिवसांनंतर आरोपीला पकडण्यात पोलिसांना अखेर यश आलं आहे. आता पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. हल्ल्याआधी आणि हल्ल्याच्या नंतर आरोपीने कुठे-कुठे गेला, याचा शोध सुरु आहे. सैफ अली खानवर चाकू हल्ला केल्यानंतर आरोपीने पळ काढला. आता समोर आलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी रुग्णालयात सैफ अली खानवर शस्त्रक्रिया सुरु होती त्यावेळी हल्लेखोर हॉटेलमध्ये आरामात नाश्ता करत होता, अशी माहिती समोर आली आहे. यानंतर पकडलं जाण्याच्या भीतीने तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पळत होता.
सैफवर हल्ला केल्यानंतर आरोपी कुठे-कुठे गेला?
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, हल्ल्यानंतर आरोपी वांद्रे रेल्वे स्थानकाच्या सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झाला होता. याकाळात त्याने फोन बंद ठेवला होता. त्यानंतर तो दादरला गेला होता. दादरला त्याने फोन सुरु केला आणि एका हॉटेलमध्ये जीपेने पैसे दिले होते. पोलिसांनी मोबाईल फोनचा रेकॉर्ड काढल्यावर ही माहिती समोर आली आहे. बुधवारी मध्यरात्री सैफ अली खानवर हल्ला झाला, यानंतर गुरुवारी सकाळी हल्लेखोर वरळीतील एका हॉटेमध्ये नाश्ता करण्यासाठी गेला होता. तर दुसरीकडे, गुरुवारी सकाळी रुग्णालयात जखमी सैफ अली खानवर शस्त्रक्रिया सुरु होती.