Dhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..

Continues below advertisement

Dhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात आरोपांची राळ उठून पालकमंत्रीपद गेल्यानंतर राज्याचे अन्न न नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी रविवारी आपल्या पक्षाचे आभार मानले. संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder) प्रकरणात मकोका लागलेला वाल्मिक कराड (Walmik Karad) हा धनंजय मुंडे यांचा खास कार्यकर्ता आहे. त्यामुळे देशमुख हत्याप्रकरणाच्या निष्पक्ष तपासासाठी धनंजय मुंडे यांच्या मंत्रि‍पदाचा राजीनामा घ्यावा, या मागणीने जोर धरला होता. मात्र, अजित पवार यांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना अभय देत त्यांच्या पाठीशी पक्षाची ताकद उभी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिर्डीत अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात बोलताना धनंजय मुंडे यांनी पक्षाचे आभार मानले. 

माझ्या वैयक्तिक विषयात पक्ष माझ्या मागे उभा राहिला. माझ्या देहावरील अग्नीचा धूर देखील त्याची परतफेड करु शकत नाही. जेव्हा गरज पडली तेव्हा आम्ही तुमच्यासाठी शत्रुंना शिंगावर घेण्यात मागे हटलो नाही. टीका करायचचं ठरलं तर माझ्यासारखा टीकाकार कोणी होऊ शकत नाही. आपल्याला नवसंकल्प करायचा असेल तर कार्यकर्त्याला तेवढा विश्वास ठेवला पाहिजे. अविश्वास दाखवून काय होणार ? उद्या पक्षाने मी अजितदादांना शब्द देतो, मी निष्ठावान कार्यकर्ता आहे. उद्या माझ्यावर पाँडेचरीची जबाबदारी दिली ना तरी मी पूर्ण मनापासून ती जबाबदारीने पार पाडेन, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram