Maharashtra Politics Animal Park Special Report : महाराष्ट्रात राजकीय अॅनिमल पार्क?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएकदा प्र. के. अत्रे यांनी अग्रलेखात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा उल्लेख निपुत्रिक असा केला... त्यानंतर यशवंतरावांनी अत्र्यांना फोन केला... चले जाव चळवळीच्या आंदोलनात, माझ्या गरोदर पत्नीच्या पोटावर ब्रिटिशांनी काठ्या मारल्या... म्हणून ती कधीच आई होऊ शकत नाही, असं यशवंतरावांनी सांगितलं... त्यानंतर अत्रे हेलावून गेले... आणि तातडीने यशवंतरावांच्या घरी जाऊन, वेणूताईंसमोरच बिनशर्त माफी मागितली... इतका सुसंस्कृतपणा या मराठी मातीत जोपासला जात होता... मंडळी, तुम्ही म्हणाल, हे सगळं आता का सांगताय... तर, त्याचं कारण आहे, हल्ली महाराष्ट्राच्या राजकारणात शिव्यांच्या लाखोल्यांचं वाढलेलं प्रमाण... तशी एक ऑडिओ क्लिपही व्हायरल झालीय... त्यावर आता सुसंस्कृत महाराष्ट्र एक प्रश्न विचारतोय...
राज्याच्या राजकारणाचा अॅनिमल पार्क झालाय का?