Radhakrishna Vikhe Patil : दुर्लक्ष करा जरा,गाड्या चालू द्या; वाळू माफियांना अप्रत्यक्ष अभय?
Radhakrishna Vikhe Patil : दुर्लक्ष करा जरा,गाड्या चालू द्या; वाळू माफियांना अप्रत्यक्ष अभय?
जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे वादग्रस्त विधान पालकमंत्री जयकुमार गोरे आणि जिल्हाधिकाऱ्यांना वाळूच्या गाड्यांकडे दुर्लक्ष करण्या बाबत केले वक्तव्य वाळू खडी गाड्या घेऊन जाणारे आपलेच लोक आहेत... वाळू आणि खड्यांच्या गाड्यांना अभय देण्याबाबत विखे पाटलांचे वक्तव्य Anchor _ टेंभुर्णी येथे आपल्या भाषणात बोलताना तुमच्या जिल्ह्यात वाळू आणि क्रेशरच्या गाड्या भरपूर.. त्यांच्या कडे दुर्लक्ष करा.. सगळी आपलीच लोक आहेत.. अस वक्तव्य केल.. मी पालकमंत्री असताना अनेक वेळेला याबाबत तक्रारी व्हायच्या पण मी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना याकडे दुर्लक्ष करण्याचे सांगितले होते .. कारण हे घेऊन जाणारे सगळे आपलेच लोक आहेत असे सांंगत वाळू आणि खडीच्या गाड्यांना अभय द्या असे सूचक वक्तव्य भाषणात विखे पाटील यांनी जयकुमार गोरे यांना केल्याने खळबळ उडाली आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यात वाळू माफियांनी थैमान घातला असून चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना अवस्था झाली आहे. अशावेळी विखे पाटील यांचे वक्तव्य भाजपला अडचणीत आणणारे ठरणार आहे.