ट्रेंडिंग
Jyoti Malhotra Special Report : यूट्यूबर ज्योतीच्या माथ्यावर गद्दारीचा कलंक कसा लागला?
Jyoti Malhotra Special Report : यूट्यूबर ज्योतीच्या माथ्यावर गद्दारीचा कलंक कसा लागला?
कोरोना काळात गुरुग्राममधून शेवटची नोकरी सोडून ज्योती मल्होत्रा हिसारला परतली आणि तिथूनच तिने सोशल मीडियावर व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. यूट्यूब व्हिडिओ आणि ट्रॅव्हल ब्लॉगिंगमधून पैसे येऊ लागल्यावर तिने हाच मार्ग पुढे चालण्याचा निर्णय घेतला. इथूनच तिच्या आयुष्यात वळण आलं. मोठ्या गाड्यांमध्ये फिरण्याची, उच्चभ्रू लोकांसोबत उठबस करण्याची, चंगळखोरी करण्याची आणि बँक खात्यात मोठी रक्कम असावी ही इच्छा तिला देशविरोधी कारवायांच्या मार्गावर घेऊन गेली. हिसारमधील एफसी वुमन कॉलेजमधून तिने बीए पूर्ण केलं. ज्योती ही तिच्या आई-वडिलांची एकमेव मुलगी आहे
ज्योती मल्होत्राच्या 'ट्रॅव्हल विथ जो' या चॅनलवर 3.77 लाख यूट्यूब फॉलोअर्स आणि 1.31 लाख इंस्टाग्राम फॉलोअर्स आहेत. ती देश-विदेशातील विविध ठिकाणांच्या प्रवासाशी संबंधित माहिती आणि प्रसिद्ध स्थळांचे व्हिडिओ शेअर करत असते. तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील चांगले व्ह्यूज मिळतात. ज्योतीने 22 ऑक्टोबर 2018 रोजी आपला पासपोर्ट बनवला होता. त्यानंतर ती काही काळ नोकरी करत राहिली. सुमारे तीन वर्षांपूर्वी तिने 'ट्रॅव्हल विथ जो' नावाने यूट्यूब चॅनल सुरू केला आणि व्हिडिओ बनवायला सुरुवात केली.