लसीकरण प्रमाणपत्र तपासलं जातंय का? मास्क न घातलेल्यांवर कारवाई होतेय? 'माझा'चा रिअॅलिटी चेक
abp majha web team
Updated at:
06 Jan 2022 09:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMaharashtra Covid Rules : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पुण्यात पत्रकार परिषद घेत कोरोनाच्या अनुषंगाने घालून देण्यात आलेल्या नियमांची कठोरपणे अंमलबजावणी केली जाईल असं सांगितलं होतं. पुणे शहरात आता त्याची अंमलबजावणी होताना दिसते. शहरातील मॉलमध्ये हॉटेलात इतरही खाजगी ठिकाणी प्रवेश करण्यापूर्वी कोरोना लस घेतली की नाही याची खात्री केली जाते. नो मास्क एन्ट्री, लोकांच्या तोंडावर मास्क देखील आहे. फक्त सोशल डिस्टंसिंग चे तेवढे पालन होताना दिसत नाही. गेल्या दोन-तीन दिवसांपासून या मॉल मध्ये ग्राहकांची गर्दी कमी झाली आहे. बॉल मध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे ऑफर सुद्धा देण्यात आले आहेत.