Special Report : लस मोफत, मात्र लसीकरण कसं होणार? 18 ते 44 वयोगटातील प्रत्येकाला लस कशी मिळणार?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Apr 2021 11:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : देशात 16 जानेवारीपासून जाहीर करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याला 1 मे पासून सुरुवात होत आहे. यामध्ये 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण केलं जाणार आहे. या लसीकरण मोहिमेची नोंदणी प्रक्रिया बुधवारी, 28 एप्रिलपासून सुरु झाली आहे. बुधवारी जवळपास 1 कोटींहून अधिक नागरिकांनी लसीकरणासाठी नोंदणी केल्याची माहिती मिळत आहे. नोंदणी प्रक्रिया सुरु झाल्यानंतर कोविन पोर्टलवर अडचणी आल्या मात्र नंतर (http://cowin.gov.in), आरोग्य सेतु आणि उमंग अॅप वर रजिस्ट्रेशन व्यवस्थित सुरु झालं. रात्री आठ वाजेपर्यंत एकूण 79 लाख 65 हजार 720 लोकांनी लसीसाठी नोंदणी केली होती.