मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात सध्या कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना लसीचा एकही डोस शिल्लक नाही. त्यामुळे लसीकरण पूर्णपणे थांबलं आहे. काही जिल्ह्यांमध्ये दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला कोरोना लसीचा साठा उपलब्ध झाला नाही तर लसीकरण मोहीम अडचणीत येऊ शकते. मुंबईसह काही ठिकाणी लसीकरण मोहिम थांबली असल्याचं चित्र आहे. महाराष्ट्रात केवळ तीन दिवस पुरेल एवढाच कोरोना लसीचा साठा शिल्लक असून केंद्राने लवकरात लवकर लस पुरवावी अशी मागणी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कालच केली होती.
Vaccine Shortage : लसीचा पुरेसा पुरवठाच नाही, मग टीका उत्सव कसा करायचा? Special Report
प्रशांत कदम, एबीपी माझा, दिल्ली
Updated at:
09 Apr 2021 10:59 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App