Himachal Pradesh Landslide : हिमाचलमधल्या दुर्घटनांचा अर्थ काय? जगभरात ग्लोबल वाॅर्मिंगचा वाढता धोका
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Jul 2021 11:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppHimachal Pradesh Landslide collapce : हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यातील सांगला परिसरात रविवारी दरड कोसळून झालेल्या अपघातात नागपूरच्या प्रतीक्षा पाटील या तरुणीसह 9 पर्यटकांचा मृत्यू झालाय. तर तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
किन्नौर येथे मोठ्या पहाडावर झालेल्या भूस्खलनामुळे पर्यटकांच्या टेम्पो ट्रॅव्हल्सवर मोठी दरड कोसळली. या वाहनात राजस्थान, महाराष्ट्र आणि दिल्लीतील पर्यटकांचा समावेश होता.
मृतकांमध्ये चार महिला असून या अपघातात राजस्थानच्या एकाच कुटुंबातील तिघांचाही मृत्यू झालाय. प्रतीक्षा पाटील नागपूर जिल्ह्यातील पाटणसावंगी येथील राहणारी होती.