Maharashtra New CM : Eknath Shinde आणि Devendra Fadnavis यांची बंद दाराआड चर्चा? Special Report
Maharashtra New CM : Eknath Shinde आणि Devendra Fadnavis यांची बंद दाराआड चर्चा?
महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी काही तासांवर आलाय. याच शपथविधीआधी महायुतीत अनेक घडामोडी घडतायत. या घडामोडींचे केंद्रबिंदू होते काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. शिंदेंचं आजारपण आणि त्यानंतर सुरु झालेल्या नाराजीच्या चर्चा याभोवतीच गेले दोन दिवस महायुतीतलं राजकारण फिरतंय. पण या सगळ्या पिक्चरमध्ये ट्विस्ट आणणाऱ्या अनेक महत्वाच्या घटना घडल्या. सहा दिवसानंतर शिंदे वर्षा बंगल्यावर पोहोचले. आणि सहा दिवसानंतर फडणवीस-शिंदे या दोन नेत्यांची बंद दाराआड भेटही झाली... पाहूयात आजच्या राजकीय शोलेमध्ये याच सगळ्या घडामोडी आणि राजकीय कुरघोडी...