TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 4 डिसेंबर 2024 : ABP Majha
TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 4 डिसेंबर 2024 : ABP Majha
मुख्यमंत्रिपदाच्या नावावर आज होणार शिक्कामोर्तब, भाजप केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत विधिमंडळ पक्षाची बैठक
भाजप विधिमंडळ पक्षनेता निवडीनंतर महायुती आजच करणार सत्तास्थापनेचा दावा, राज्यपालांना भेटण्यासाठी दुपारी साडेतीनची वेळ
एकनाथ शिंदे आणि फडणवीसांच्या वर्षा बंगल्यावरील बैठकीत अंतिम तोडगा नाहीच...शिंदेंना हवं असलेलं गृहखातं भाजपकडेच राहणार,एबीपी माझाला खात्रीलायक सूत्रांची माहिती...
अजित पवार सलग दोन रात्री दिल्लीत, आज मुंबईला परतणार, अर्थखात्यासाठी आग्रही असलेल्या दादांची सकाळी अमित शाहांसोबत भेट होणार की नाही याची उत्सुकता
महत्त्वाच्या खात्यांसाठी शिवसेनेतही लाॅबिंग, निवडक आमदारांना आज मुंबईत उपस्थित राहण्याच्या सूचना, सात जणांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता
नवं सरकार येताच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची काटेकोर तपासणी, अपात्र लाभार्थ्यांची होणार गच्छंती
दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरून उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा संताप...केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहानासमोरच मोदी सरकारला सुनावले खडेबोल...