Dhananjay Munde : धनंजय मुंडेंचा राजीनामा पोस्टपोन; दमानियांचा 'प्लॅन बी' Rajkya Shole Special Report

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appधनंजय मुंडेंचा राजीनामा सध्या तरी लांबणीवर पडलाय. अंजली दमानिया यांनी अजितदादांना दिलेले पुरावे धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यासाठी पुरेसे ठरलेले नाहीत. कदाचित हेच गृहित धरून अंजली दमानियांनी प्लॅन बी तयार केलाय. दुसरीकडं सततच्या टीकेमुळं हैराण झालेल्या धनंजय मुंडेंनी आपल्या भावनांना आज वाट करून दिलीय. पाहूया, याविषयीचा खास रिपोर्ट.
राजीनाम्यासाठीचा वाढत चाललेला दबाव..
जिल्ह्यातील सर्वपक्षीयांकडून होणारी टीका..
आणि
गेल्या महिन्याभरापासून रोजच्या रोज होणारे आरोप.
.
या सगळ्यापासून स्वतःचा बचाव करता करता धनंजय मुंडे आज असे भावनिक झाले.
गेला महिनाभर सतत कुठल्या ना कुठल्या घाईत दिसणाऱ्या धनंजय मुंडेंनी आज मात्र माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर बराच वेळ घालवला आणि माध्यमांच्या प्रश्नांना शांत आणि सविस्तर उत्तरं दिली.
त्यापैकी कळीचा प्रश्न होता तो राजीनाम्याच्या मागणीचा.
मुंडेंच्या या उत्तराला पार्श्वभूमी होती ती कालच्या दमानिया-अजित पवार भेटीची.
धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यासाठी आवश्यक असणारे सर्व पुरावे अजितदादांकडे दिल्याचा दावा दमानियांनी केला.
त्यानंतर मुख्यमंत्र्यांचीही त्यांनी भेट घेतली.
केवळ पुरावे देऊन दमानिया थांबल्या नाहीत.
जर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात आला नाही, तर आपला प्लॅन-बी काय असेल, हेदेखील दमानियांनी स्पष्ट केलं.
आता दमानियांनी दिलेल्या पुराव्यांचं पुढे काय होणार, या प्रश्नावर फार चर्चा होण्याआधीच अजित पवारांनी हा विषय हातावेगळा केला.
शिवाय दोषी आढळल्याशिवाय धनंजय मुंडेंचा राजीनामा न घेण्याची भूमिका ही आपली एकट्याची नसून मुख्यमंत्र्यांचीही असल्याचं सांगून टाकलं.
आपण आणि मुख्यमंत्री एकत्रितपणे निर्णय घेऊ असं अजित पवार सांगत असताना भाजप आमदार सुरेश धसांनी मात्र मुंडेंच्या राजीनाम्याची जबाबदारी फक्त अजितदादांची असल्याचं सांगत राष्ट्रवादीवरचा दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला.
थोडक्यात, धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जाण्याची शक्यता अजित पवारांच्या स्पष्टीकऱणानंतर मावळल्याचं स्पष्ट आहे.
आता दमानिया त्यांचा प्लॅन बी ऍक्टिवेट करणार का, याची उत्सुकता आहेच..
शिवाय धनंजय मुंडेंना पुन्हा भावनिक करण्यासाठी विरोधक नव्याने कुठल्या गोष्टी समोर आणतात, याकडेही राज्याचं तितकंच लक्ष असणार आहे.