ABP News

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11PM 18 February 2024

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11PM 18 February 2024 

शिवप्रेमींच्या संतापानंतर छत्रपती संभाजाराजेंबद्दलचा विकिपीडियावरचा मराठीतला आक्षेपार्ह मजकूर हटवला...इंग्रजीवरचा मजकूर अजूनही कायम...तात्काळ कारवाई करण्याचे फडणवीसांचे आदेश...

सत्ता आणि पैशाची मस्ती उतरलीच पाहिजे, संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया...न्यायासाठी फडणवीसांना भेटणार असल्याच माहिती...

    हत्येच्या दिवशी केज पोलिस ठाण्यात ड्युटीवर असलेल्या सर्व पोलिसांना फाशी द्या, देशमुख कटुंबीयांची सुप्रिया सुळेंकडे मागणी.. कृष्णा आंधळेला २५ तारखेपर्यंत न पकडल्यास अन्नत्याग करण्याचा इशारा 

महादेव मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सुप्रिया सुळेंनी केलं सांत्वन...पतीला न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही, उपोषण करणारच, महादेव मुंडेंच्या पत्नीची ठाम भूमिका...

शिवसेना नेत्यांसह सर्वपक्षीय आजी-माजी आमदारांच्या सुरक्षेत कपात.. वाय दर्जाची सुरक्षा असलेले आमदार सुरक्षा घटवल्यानंं संतप्त.. 

एकनाथ शिंदेंमार्फत दबाव आणून तानाजी सांवंतांनी स्वत:च्या सुरक्षेसाठी ४८ पोलिसांची नियुक्ती केल्याचं उघड...फडणवीसांच्या दणक्यानंतर आता एकच पोलीस सुरक्षारक्षक...

शरद पवारांच्या मोहोळच्या आमदाराचा पवारांना धक्का.. शिवजयंती कार्यक्रमाला आमदार राजू खरेंकडून शिंदे गटाचे भरत गोगावले आमंत्रित, बॅनवरवरुनही तुतारी गायब 

रणवीर अलाहाबादियाच्या डोक्यातच घाण.. सुप्रीम कोर्टानं व्यक्त केला संताप, मात्र अलाहाबादियाला अटकेपासून दिलासा.. नव्यानं एफआयआर नोंदवण्याला मनाई.. ठाणे पोलिसांकडे पासपोर्ट जमा करण्याचे आदेश..


यु ट्यूब चॅनेल आणि यु ट्युबर्स यांच्याविरुद्ध सरकार काही करणार आहे का, रणवीर अलाहाबादिया प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला सवाल, तुम्हाला जमत नसेल तर आम्ही गप्प बसणार नाही असाही इशारा...

राज्यात एकच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्यासाठी डबल केसरी चंद्रहार पाटलांच्या उपोषणाला सुरुवात, अनेक पैलवानांसोबत चिरंजीव शिवाजी आणि कन्या युगंधराही करणार उपोषण 

मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती वादाच्या भोवऱ्यात, ज्ञानेश कुमारांच्या नियुक्तीवर काँग्रेस कोर्टात जाणार, राहुल गांधींचा नावाला विरोध असल्याची माहिती

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram