
Shivjayanti 2025 Solapur | सोलापुरात 21 हजार बटनांच्या सहाय्याने साकारली शिवरायांची प्रतिमा
Shivjayanti 2025 Solapur | सोलापुरात 21 हजार बटनांच्या सहाय्याने साकारली शिवरायांची प्रतिमा
आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती.. सोलापुरातील कलाकार विपुल मिरजकर यांनी शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजाना अनोख्या पद्धतीने वंदन केलंय. कलाकार विपुल मिरजकर याने चक्क शर्टच्या बटनाचा वापर करून शिवरायांची प्रतिमा साकारली आहे. या साठी त्याने सुमारे 21 हजार हून अधिक बटनांचा वापर केलाय. ही प्रतिमा साकारण्यासाठी त्याला सुमारे 4 दिवसाचा कालावधी लागला आहे. कलाकृतीचा साइज 4 × 5 फूट इतका असून पाच वेगवेगळ्या रंगाचे बटन यासाठी त्याने वापरलेत.
हे ही वाचा..
HSRP Number Plate : राज्य सरकारकडून एचएसआरपी (HSRP) अर्थात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आली आहे. 30 एप्रिलपर्यंत तुमच्याकडे ही नंबर प्लेट बसवलेली नसल्यास आरटीओ विभागाकडून कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. राज्य परिवहन विभागाने 'हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट' (एचएसआरपी) 2019 च्या पूर्वीच्या वाहनांना बसवण्यासाठी एका महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे वाहनचालकांना आता 30 एप्रिलपर्यंत ही नंबरप्लेट बसविणे बंधनकारक करण्यात आलं आहे. सुरुवातीला 31 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. वर्ष 2019 पूर्वीच्या पुणे प्रादेशिक परिवहन विभागात जवळपास 25 लाख वाहने आहेत.
आतापर्यंत सात ते आठ हजार वाहनांना बसवली नंबर प्लेट
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज्यातील सर्व वाहनांना एचएसआरबी नंबर प्लेट बसवावी लागणार आहे. त्यासाठी एका कंपनीला यासंबंधीचे सर्व काम देण्यात आले असून, ही नंबरप्लेट बसवण्यासाठी सुरुवात झाली आहे. पण वाहनचालकांचा अद्याप प्रतिसाद अद्याप मिळत नाही. आतापर्यंत सात ते आठ हजार वाहनांना ही नंबर प्लेट बसवण्यात आली आहे. तर, तेवढ्याच वाहनांचे नंबर प्लेट बसविण्यासाठी अर्ज आले असल्याची माहिती आहे. त्यामुळे 31 मार्चपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहनांना ही नंबर प्लेट बसवणे शक्य नाही. त्यामुळे परिवहन विभागाने ही नंबरप्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी केली जात होती.