
ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7 AM 19 February 2025
ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7 AM 19 February 2025
छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती, ठिकठिकाणी शिवभक्तांकडून आकर्षक विद्युत रोषणाई, आज दिवसभर विविध कार्यक्रमांचंही आयोजन.
किल्ले शिवनेरीवर आज शासकीय शिवजयंती सोहळा.. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित..
मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सायंकाळी आग्रा किल्ल्यावर खास शिवजयंती उत्सव.. अभिनेता विकी कौशलचीही शिवजन्मोत्सव सोहळ्याला उपस्थिती
नवी मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ३२ माजी नगरसेवक पुन्हा भाजपवासी.. संदीप नाईकांच्याही भाजपमध्ये परतण्याच्या चर्चांना वेग?
अनैतिक संबंधांतून सरपंचांची हत्या झाल्याचं भासवण्याचा कट, सुप्रिया सुळेंशी बोलताना देशमुख कुटुंबीयांसह ग्रामस्थांचा बीड पोलिसांवर गंभीर आरोप, धस यांच्याकडूनही आरोपांना दुजेरा
दिशा सालियनच्या कुटुंबाचे अश्रू पुसायला जाणार का? सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारताना नितेश राणेंकडून सरपंच हत्येची दिशा सालियन मृत्यू प्रकरणाशी तुलना
शिवप्रेमींच्या संतापानंतर छत्रपती संभाजीराजेंबद्दलचा विकिपीडियावरचा मराठीतला आक्षेपार्ह मजकूर हटवला...इंग्रजी मजकूर अजूनही कायम...तात्काळ कारवाई करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश...