Covid Vaccine Dry Run | कोरोना लसीचा डोस तुम्हाला कसा मिळेल? पाहा कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Dec 2020 11:58 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नवी दिल्ली : आजपासून देशाच्या कानाकोपऱ्यात कोरोना लस पोहोचण्याची तयारी सुरु होणार आहे. पंजाब, आसम, आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्ये कोरोना लसीकरणाच्या तयारीच्या आढावा घेण्यासाठी दोन दिवसांचा ड्राय रन करण्यात येणार आहे. या चार राज्यांच्या पाच ठिकाणी ड्राय रन केलं जाणार आहे. लसीकरणाआधी सर्व तयारीचा आढावा घेणं किंवा त्रुटी असतील तर त्या दूर करणं हा या ड्राय रनचा उद्देश आहे. सोबत प्लॅनिंग, इम्प्लिमेन्टेशन किंवा रिपोर्टिंग मेकॅनिजम पाहण आणि त्यात सुधारणा करणं हा देखील उद्देश या ड्राय रनचा आहे. ड्राय रनमध्ये कोरोना लसीसाठी कोल्ड स्टोअरेज आणि वाहतुकीची व्यवस्था, परीक्षण स्थळांवर गर्दीची व्यवस्था, सोशल डिस्टन्स यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे.