Uddhav Thackeray On BMC Election : महापालिकेसाठी ठाकरेंची हिंदुत्वाची 'मशाल' Special Report
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेंद्रात सत्तेत नाही, राज्यात सत्तेत नाही, आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची सगळी मदार मुंबई महानगर पालिकेवर उरली आहे. देशातील अनेक छोट्या राज्यांपेक्षा बीएमसीचं बजेट मोठं आहे. कुठल्याही परिस्थितीत मुंबई पालिका जिंकायची असा निर्धार आज मातोश्रीवरील बैठकीत उद्धव ठाकरे आणि माजी नगरसेवकांनी व्यक्त केला. त्यासाठी स्वबळ आणि हिंदुत्व या दोन मुद्द्यांवर जास्त चर्चा झाली.
मुंबई महापालिकेसाठी उद्धव ठाकरेंनी नेमकी काय रणनीती ठरवलीय पाहुयात
- मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ठाकरेंच्या शिवसेनेची मोर्चेबांधणी
- मुंबई पालिका निवडणूक कधीही लागू शकते. आतापासूनच तयारीला लागा
- मुंबई पालिका निवडणूक स्वबळावर शिवसेनेने लढवावी
- हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरतेने लोकांपर्यंत पोहोचवा
- हिंदुत्वासाठी शिवसेना आधीही लढली आणि पुढेही लढत राहील
- आपण हिंदुत्वाचा मुद्दा सोडला असा अपप्रचार विरोधकांकडून केला जातोय त्याला उत्तर द्या
- बाहेरच्या राज्यातील लोकं भाजपसाठी काम करतात तसं आपणही तळागाळात जाऊन काम केलं पाहिजे
- १८ निरीक्षकांना नेमून प्रत्येकी १२ प्रभागांची चाचपणी करा आणि त्या अनुषंगाने अहवाल सादर करा
- मुंबई पालिका निवडणुकीपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल
- निवडणुकीत हेतू साध्य झाल्यानंतर भाजप आपलं खरं रुप दाखवेल
- आरएसएसचा आव आणून त्याखाली भाजपने वेगवेगळ्या यंत्रणा राबवल्या. आरएसएस पत्रक वाटण्यापुरती होती
- सध्या सुरु असलेल्या सत्तास्थापनेत शिंदेंच्या मागे दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती
- कुठल्याही परिस्थितीत आपल्याला मुंबई महापालिका जिंकायचीच आहे
- लवकरच राज्यातील पदाधिकाऱ्यांचे शिबीर बोलावणार, मुंबईतील गटप्रमुखांचेही शिबीर घेणार