Jankar vs Satpute : हट्ट सोडला, संघर्ष टळला; Karadwadiत घटनात्मक पेच थोडक्यात टळला Special Report
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमाळशिरसमधून पवारांच्या राष्ट्रवादीचे उत्तम जानकर निवडून आले.. मात्र मारकडवाडीत ईव्हीएमवर झालेले मतदान चुकीचे असल्याचा त्यांनी आरोप केला.. तेवढ्यावरच न थांबता कायदेशीर प्रक्रियेला न जुमानता, मतपत्रिकेवर मतदानाचं नियोजन त्यांनी केलं. अखेर आज सकाळी त्यांनी आपला निर्णय बदलला आणि एक मोठा घटनात्मक पेच टळला. पाहूयात काय घडलं मारकडवाडीत?+
राज्य निवडणूक आयोगाने या सगळ्या प्रकरणावर आपली लेखी स्पष्टीकरण दिलं.
- मारकडवाडीतील निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निर्दोष रितीने पूर्ण केली .
- मारकडवाडीतील ९६,९७, ९८ या तिन्ही बूथचं मतदान आणि मतमोजणीत कोणतीही विसंगती आढळली नाही.
- मतदान ते मतमोजणी प्रत्येक टप्प्यावर उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधीला सहभागासाठी कळवले होते.
- मतदानावेळी उमेदवारांचे प्रतिनिधी पोलिंग एजंट उपस्थित होते, त्यांच्याकडून कोणीही तक्रार केली नाही.
- मतमोजणीवेळी उमेदवारांचे काऊंटिंग एजंट उपस्थित होते, त्यांनी तक्रार किंवा आक्षेप घेतला नाही
- मतदान, मतमोजणी , निकाल प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची त्रुटी, विसंगती आढळली नाही.