IPL Suspended | भारत पाकिस्तानमध्ये तणाव, BCCI चा आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय Special Report
IPL Suspended | भारत पाकिस्तानमध्ये तणाव, BCCI चा आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय Special Report
भारत आणि पाकिस्तानदरम्यान सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याच कारणामुळे खेळाडूंच्या सुरक्षिततेचा विचार करत बीसीसीआयनं सुरु असलेली आयपीएल स्थगित करण्याचा मोठा निर्णय़ घेतलाय. या स्पर्धेत अजून १६ सामने बाकी आहेत. पण भारतातली सध्या तणावाची परिस्थिती पाहता स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय भारतानं घेतलाय. आयपीएलच्या आजवरच्या १८ वर्षांच्या इतिहासात स्पर्धा मध्येच थांबवण्याची ही दुसरी वेळ ठरली आहे... पाहूयात याचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट...
हिमाचलच्या धरमशालामध्ये गुरुवारी दिल्ली आणि पंजाब संघात सामना सुरु होता... पण सामन्यादरम्यान अचानक ब्लॅकआऊट झाला... खेळाडू मैदानातून ड्रेसिंग रुमकडे धावताना दिसले आणि अवघ्या काही मिनिटात पोलिसांनी स्टेडियम खाली केलं...
भारत आणि पाकिस्तामध्ये वाढलेल्या तणावामुळे बीसीसीआयनं धरमशालातला सामना रद्द केला आणि त्यानंतर काही तासातच उर्वरित सामने अनिश्चित काळासाठी स्थगित केले त्यामुळे आयपीएलच्या इतिहासात दुसऱ्यांदा स्पर्धा मध्येच थांबवावी लागली.... आयपीएलचं नवं शेड्यूल परिस्थिती आणि आगामी आंतरराष्ट्रीय कॅलेंडर लक्षात घेऊन जाहीर केलं जाईल
आयपीएलच्या १८व्या मोसमात आतापर्यंत ५८ सामने झाले १२ साखळी सामन्यांसह ४ प्ले ऑफ्स मिळून १६ सामने अजून बाकी आहेत हे सामने आगामी इंग्लंड दौऱ्यानंतर होण्याची शक्यता आहे आयपीएलसाठी सध्या भारतात असलेल्या परदेशी खेळाडूंना सुरक्षितपणे त्यांच्या देशात पाठवण्यात येणार आहे
All Shows

































