एक्स्प्लोर
औषधं आणायला गेलेल्या तरुणाचा मोबाईल फोडून कानशिलात लावणाऱ्या सुरजपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचं निलंबन
रायपूर : आई-वडिलांची औषधं आणायला गेलेल्या एका युवकाला कानशिलात लावून त्याला पोलिसांकडून मारहाण करणाऱ्या सुरजपूरचे जिल्हाधिकारी रणवीर शर्मा यांचं तात्काळ निलंबन करावं असा आदेश मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी दिलाय. तसेच या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय की, "सुरजपूरचे जिल्हाधिकारी रणवीर शर्मा यांनी एका युवकाशी गैरव्यवहार केल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळाली. ही घटना अत्यंत दु:खद आणि निंदनीय आहे. छत्तीसगडमध्ये अशा प्रकारचे वर्तन कधीही सहन केलं जाणार नाही. जिल्हाधिकारी रणवीर शर्मा यांना तात्काळ निलंबित केलं जात आहे."
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report

Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha

Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report

Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha

Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
क्रिकेट
क्रिकेट


























