Tej Pratap Yadav थोरल्याचा 'प्रताप' लालूंकडून हकालपट्टी,विरोधकांचा नैतिकतेवरुन निशाणा Special Report
Tej Pratap Yadav थोरल्याचा 'प्रताप' लालूंकडून हकालपट्टी,विरोधकांचा नैतिकतेवरुन निशाणा Special Report
बिहार विधानसभेच्या निवडणुकीला अवघे सहा महिने बाकी आहेत. ही निवडणूक एनडीएसाठी, नितीशकुमारांसाठी आणि राजदच्या लालूप्रसाद यादव यांच्यासाठी अतिमहत्वाची आहे. अशा काळात राजदला एक मोठा हादरा बसलाय. लालूंच्या थोरल्या मुलाने, तेजप्रतापने आपल्या विवाहबाह्य संबंधांची थेट सोशल मीडियावर फोटो टाकत कबुली दिलीय. यावरुन लालू आणि राजदवर चहुबाजुंनी टीका झाली. अखेर लालूंनी तेजप्रताप यादवची पक्षातून हकालपट्टी केलीच, सोबत कुटुंबातून बेदखलही केलं. पाहुयात यादव कुटुंबातील यादवीचा हा स्पेशल रिपोर्ट
बिहार निवडणुकीच्या तोंडावरच लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल या पक्षाला आणि यादव परिवाराला भूकंपाचे हादरे बसले. राजदने लालूपुत्र तेज प्रताप यादव यांना ६ वर्षांसाठी पक्षातून काढून टाकलंय. तेज प्रताप यांची एक फोटोपोस्ट सोशल मीडियावर बरीच चर्चेत होती.
हा फोटो तेज प्रताप यादव यांच्या फेसबुक अकाउंटवरून शनिवारी पोस्ट करण्यात आला होता..
तेज प्रतापने पहिल्यांदाच अनुष्का यादवसोबत आपले १२ वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचे उघडपणे मान्य केले.
अकाउंट हॅक करुन एआय वापरून बनावट फोटो पोस्ट केल्याचं तेजप्रतापने सांगितलं. पण तोपर्यंत प्रकरण हाताबाहेर गेले होते...
या प्रकरणावरुन एवढा गदारोळ झाला कारण तेजप्रताप यादव यांचं सात वर्षांपूर्वी ऐश्वर्यासोबत लग्न झालंय. १२ वर्षांपासून अनुष्कासोबत संबंध होते तर ऐश्वर्यासोबत लग्न का केलं हा प्रश्न विचारला जातोय.
बिहार भाजपनेही लालू कुटुंबाच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करायला सुरुवात केली होती...