Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
नागपूरमध्ये ईद-ए-मिलाद आणि गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी झालेल्या तणावाच्या घटना लक्षात घेता, शहरात नागपूर पोलीस, एसआरपीएफ आणि सीआरपीएफच्या तुकड्यांसह चार हजार पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. संवेदनशील भागांमध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त पाहायला मिळत आहे. आज ईद-ए-मिलाद असल्याने मुस्लिम बांधवांकडून जुलूसाचे आयोजन करण्यात आले आहे. या जुलूसाच्या पार्श्वभूमीवर देखील पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. संपूर्ण नागपूर शहरात जवळपास चार हजार पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात आहेत. शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे.