Raj Kundra Shilpa Shetty Notice : राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीला मोठा धक्का; लुकआऊट नोटीस जारी होणार?
मुंबई पोलीस बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्रा यांच्याविरोधात लुकआऊट सर्क्युलर जारी करण्याच्या तयारीत आहे. एका व्यावसायिकानं शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याविरुद्ध साठ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग (EOW) आता पतीपत्नी विरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्याची तयारी करत आहे. पोलीस दोघांच्या प्रवास नोंदी तपासत आहेत. गरज पडल्यास त्यांच्याविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी केली जाईल. या बातमीसह दुपारच्या बातम्यांमध्ये अधिक माहिती दिली जाईल. या प्रकरणात 60 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.