Eknath Shinde : जरांगेंना शिंदेंचं कौतुक, फडणवीसांचा राग का? माझाच्या न्यूजरुममध्ये DCM एकनाथ शिंदे

Eknath Shinde : जरांगेंना शिंदेंचं कौतुक, फडणवीसांचा राग का? माझाच्या न्यूजरुममध्ये DCM एकनाथ शिंदे

मराठा आरक्षणाचा जीआरबाबत मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी एकत्र निर्णय घेतला, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी स्पष्ट केलंय. तसेच मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) घेतलेला निर्णय टिकलाही पाहिजे ही सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले. त्यामुळे विरोधकांच्या टीकेकडे लक्ष देत नाही, असं एकनाथ शिंदेंनी सांगितले. एकनाथ शिंदेंनी यांनी एबीपी माझाच्या गणरायाचे दर्शन घेतले. त्यावेळी एकनाथ शिंदेंनी एबीपी माझाला खास मुलाखत दिली. दरम्यान, एकनाथ शिंदेंनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर देखील भाष्य केलं. 

मनोज जरांगे पाटील यांचं एकनाथ शिंदेंवर एवढं प्रेम का?, तसेच मनोज जरांगेंना देवेंद्र फडणवीसांचा राग का?, असा सवाल एकनाथ शिंदेंना विचारण्यात आला. यावर मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असताना जे काही निर्णय घेतले ते टीम म्हणून घेतले. जनहिताचे निर्णय घेतले, असं एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच आधीच्या लोकांनी जे स्पीडब्रेकर टाकले होते, विकासाच्या कामांमध्ये ते आम्ही काढून टाकले. अनेक लोकाभिमुख प्रकल्प तातडीने, वेळेच्या आधी मार्गी लावले. मुख्यमंत्री हे राज्याचं प्रमुखपद आहे. मनोज जरांगेंनी समाजासाठी आंदोलन केलं आणि त्यांनी आपल्या संस्कृतीचं पालन केलं पाहिजे. माझ्याबद्दल कोण, काय संशय व्यक्त करतं याचा विचार मी करत नाही. मी कुठलीही गोष्ट लपून-छपून करतो, उघडपणे करतो. जे कुणी माझ्यावर असले आरोप करतो त्याला उत्तर देण्याची गरज मला नाही, असं एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलं. मी मुख्यमंत्री होतो, तरी कार्यकर्ता म्हणून काम पाहत होतो, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola