Bhandara Assassination Special Report : दृश्यम स्टाईल मर्डर, पोलीस पाटीलच निघाला आरोपी
Bhandara Assassination Special Report : दृश्यम स्टाईल मर्डर, पोलीस पाटीलच निघाला आरोपी
दृश्यम चित्रपट सर्वांना आठवतं असेल....त्यात गायब झालेल्या युवकाची पोलीस शोध मोहीम राबविते. अथक प्रयत्नानंतरही पोलिसांना शोध कार्यात यश येतं नाही...काहीसा असाच प्रकार घडला आहे, भंडाऱ्यातील गोबरवाही पोलीस स्टेशन हद्दीत. 2019 मध्ये बेपत्ता झालेल्या तरुणीच्या मृतदेहाची जंगलात विल्हेवाट लावल्याची कुणकुण आता तब्बल चार वर्षानंतर भंडारा पोलिसांना लागली. त्यामुळं भंडारा पोलिस मागील चार दिवसांपासून बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह शोधण्यात दिवसरात्र लागलीय...आरोपींनी तरुणीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची कबुली दिली असली तरी, मृतदेहाचा शोध लावण्यात पोलिसांना अद्याप यश आलं नाही, त्यामुळं पोलिसांवरील दबाव वाढताना दिसतोय.
भंडारा जिल्ह्यातील शेवटच्या टोकावरील कवलेवाडा या गावातील हा धक्कादायक प्रकार असून तब्बल चार वर्षांनी या गुन्ह्याची उकल झाली आहे. कवलेवाडा गावातील अल्पशिक्षित आदिवासी कुटुंबातील अर्चना ही 23 वर्षीय तरुणी गावातील गर्भश्रीमंत पाटलाच्या घरी काम करीत होती. ती अचानक 20 एप्रिल 2019 ला गायब झाली. कुटुंबियांनी तिच्या बेपत्ता होण्याची पोलिसात तक्रार दिली, मात्र पोलिसांनी काही दिवस शोध मोहीम राबविल्यानंतर प्रकरणाची फाईल बंद केली. मागील चार वर्षांपासून बेपत्ता असलेल्या तरुणीच्या बाबत पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून ही बंद झालेली फाईल पुन्हा उघडण्यात आली आहे.