Bajrang Sonawane vs Walmik Karad : मुलासाठी धावा कराडविरोधात 'पुरावा' Special Report
वाल्मिक कराड... राज्यभर गाजलेल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सध्या कोठडीची हवा खाणारा आरोपी.. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे यांनी वाल्मिक कराडला आणखी एका प्रकरणात आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय... कोणतं आहे ते प्रकरण..? आणि हे आरोप करताना खासदारांनी कोणता मोठा पुरावा सादर केलाय..? पाहुयात आमचे प्रतिनिधी स्वानंद पाटील यांचा हा स्पेशल रिपोर्ट
ज्या पद्धतीनं बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं होतं. त्याचप्रमाणे, २१ जूनला झालेल्या विलास घुलेच्या हत्येनंतर देखील मराठवाड्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. कारण या हत्येमागे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरववर आरोप लावण्यात आले होते. मात्र बजरंग सोनवणे यांनी आता एक ऑडिओ क्लिप जगासमोर आणत, आधीच जेलची हवा खात असलेल्या वाल्मिक कराडला पुन्हा एकदा आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय))
विलास घुले हत्या प्रकरणात सौरव सोनवणेंना अडकवण्याचा कट,
संतोष देशमुख हत्याप्रकरणी कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडनं जेलमध्ये बसून आखला..
असा खळबळजनक आरोप खासदार बजरंग सोनवणेंनी केलाय
आणि हा आरोप करताना बजरंग सोनवणे यांनी वाल्मिक कराड आणि त्याचा साथीदार सुग्रीव कराड यांच्या संभाषणाची कथित ऑडिओ क्लिप पत्रकार परिषदेत ऐकवली
एबीपी माझा या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही..
आता हा आवाज वाल्मिक कराडचा आहे की नाही हे शोधण्याचं काम तपास यंत्रणांचं आहे..
All Shows
































