Kejriwal vs Modi Special Report : संघाचा खांदा, केजरीवालांची बंदूक, अन् मोदींवर नेम SPECIAL REPORT
Kejriwal vs Modi Special Report : संघाचा खांदा, केजरीवालांची बंदूक, अन् मोदींवर नेम SPECIAL REPORT
नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल... पाच महिन्यांहून अधिक काळ जेलमध्ये राहून आलेले नेते... जेलवारी करून आल्यावर त्यांनी पहिला निर्णय घेतला तो, मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होण्याचा... आता त्यांची भाजपवरील आरोपांची तोफ धडाडू लागलीय... त्याचाच भाग म्हणून त्यांनी सरसंघचालक मोहन भागवतांवर प्रश्नांची सरबत्ती केलीय... आणि याच प्रश्नांचं टोक मोदींकडे कसं राहील? याची काळजीही केजरीवालांनी चाणाक्षपणे घेतलीय... पाहूयात...
आम आदमी पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिलीच जाहीर सभा घेत भाजपवर घणाघाती प्रहार करताना राष्ट्रीय सरसंघचाल मोहन भागवत यांच्यावरही प्रश्नांची सरबत्ती केली. मला सत्ता आणि खुर्चीचा लोभ नाही. भाजपने मला भ्रष्ट आणि चोर म्हटले तेव्हा मला वाईट वाटले. दिल्लीची निवडणूक ही माझी लिटमस टेस्ट आहे, मला प्रामाणिक वाटत असेल तरच मतदान करा, असे आवाहन त्यांनी जंतरमंतरवर जनता दरबारमधून घेतलेल्या जाहीर सभेतून केले.