Amravati Vidhan Parishad : राजकीय आजार, अमरावतीत निवडणुकीचा बाजार? Special Report
एकीकडे महायुतीत बंडखोरांना शांत करता करता नेत्यांची दमछाक होतेय.. तर दुसरीकडे अमरावतीत काँग्रेसमध्ये स्वकियांमध्येच जुंपलीय...नेत्यांचा उमेदवारावर आणि उमेदवाराचा आपल्या नेत्यावरच विश्वास नाहीये...पाहुयात अमरावतीचा ब्लॉकबस्टर सिनेमा
हा कलगीतुरा रंगलाय अमरावती विधान परिषदेच्या आखाड्यात.
इथे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत काँग्रेसचे हर्षजित देशमुख.
मंगळवारी देशमुख गायब असल्याची चर्चा रंगल्यानंतर बुधवारी ते रुग्णालयात ऍडमिड असल्याचं समोर आलं.
आपल्यावर उपचार सुरु असून डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिल्याचा व्हिडिओ त्यांनी हॉस्पिटलमधूनच रेकॉर्ड केला.
त्यानंतर देशमुखांच्या हेतूंवर थेट शंका घेत काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूरांनी त्यांच्यावर मॅनेज झाल्याचा आरोप केला.
या आरोपानंतर पित्त खवळलेल्या देशमुखांनी आज आणखी एक व्हिडिओ जारी करत यशोमती ठाकूरच भाजपच्या फायद्यासाठी आपल्यावर आरोप करत असल्याचा पलटवार केला.
तर आरोप-प्रत्यारोपांचं हे सत्र थांबवायचं असेल, तर देशमुखांनी हॉस्पिटलमधून बाहेर येऊन प्रचार सुरु करावा, असं आव्हान यशोमती ठाकूरांनी दिलंय.
All Shows
































